मुंबई – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. यातच मिळालेल्या माहितीनुसार, ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत किर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोहेना कुमारी हिचा सोमवारी करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मोहेनासोबतच तिच्या कुटुंबीयांनाही करोनाची लागण झाली होती.
अभिनेत्री मोहेना कुमारीने सांगितले की,“ होय, ही बातमी खरी आहे. माझ्या कुटुंबातील सात जणांना करोनाची लागण झाली आहे. मात्र सर्वांची प्रकृती ठीक आहे. आम्ही सगळे रुग्णालयात आहोत. आम्हा सर्वांमध्ये सौम्य लक्षणे होती. वातावरणातील बदलामुळे कदाचित असं होतं असावं वाटलं होतं. माझ्या सासूला सर्वांत आधी करोनाची लागण झाली. मात्र त्यांनाही सौम्य लक्षणे असल्याने आम्हा कुणालाच कळलं नाही. आम्ही सर्वजण आता क्वारंटाइनमध्ये असून उपचार सुरु आहेत”, असं ती म्हणाली.यानंतर मोहेनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली.” असं ही ती म्हणाली आहे .
तत्पूर्वी, कनिका कपूर,किरण कुमार, वाजिद खान,चित्रपट निर्माते करीम मोरानी, त्यांच्या दोन्ही मुली, अभिनेता पूरब कोहली, फ्रेडी दारुवालाचे वडील,सत्यजीत दुबे यांची आई अशा काही सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती.