राजगुरूनगर -जुन्या वादातून वडगाव पाटोळे (ता. खेड) येथील सरपंच दीपाली गायकवाड यांच्या कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. 31 मे) घडली. याबाबत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा सहा जणांसह इतर 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहानू गायकवाड, अजित गायकवाड, किरण गायकवाड, प्रविण गायकवाड, संकेत गायकवाड व इतर 15 ते 20 जण (सर्व रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. कुमार गायकवाड यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडगाव पाटोळे येथील गायकवाड वस्तीवर वरील आरोपींनी किरकोळ कारणावरून जमाव जमवून वडगावच्या सरपंच दीपाली गायकवाड पती रमेश गायकवाड यांच्या मुले, दीर, सून यांना जबर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले करीत आहेत.