नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील एक आरोपी मुकेश सिंग यांनी आपली शिक्षा कमी करावी या मागणीसाठी पुन्हा दाखल केलेली याचिका दिल्लीच्या कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली. हा गुन्हा जेव्हा घडला त्यावेळी आपण दिल्लीतच नव्हतो अशी भूमिका त्याने यात घेतली होती. तिहार तुरुंगात सिंग यांना छळ करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. त्याचा हा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधिश धर्मेंद्र राणा यांच्या कोर्टात दाखल करण्यात आला होता.
मुकेश सिंग यांची याचिका फाशीची आहे आणि नियोजित वेळापत्रकानुसार फाशीच्या अंमलबजावणीला उशीर लावण्याचे डावपेच म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली आहे, असे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले.
दरम्यान, सिंग यांच्या वकिलांच्या सल्ल्यानुसार योग्य संवेदनशीलता दर्शवण्यात यावी, असे कोर्टाने बार कौन्सिल ऑफ इंडियाला सांगितले. मुकेशसिंग हा मुळचा राजस्तानचा असून त्याला गुन्हा घडल्यानंतर 17 डिसेंबर 2012 रोजी राजस्तानातून दिल्लीला आणण्यात आले होते. या आरोपींना 20 मार्च रोजी फाशी दिली जाणार असून त्यासाठीचे डेथ वॉरंटही जारी करण्यात आले आहे. आता पुन्हा संबंधीत आरोपींपैकी एकाने कोर्टात धाव घेतल्याने त्यांची फाशी पुन्हा टळण्याची शक्यता आहे किंवा कसे हे कोर्टाच्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे.