पुणे – मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी तपासादरम्यान मार्केटयार्ड पोलिसांवर हल्ला करुन पसार झाला होता . ही घटना बुधवारी(दि.1 फेब्रुवारी) सायंकाळी खानापूर येथे घडली होती. या आरोपीला बिबवेवाडी पीोलसांनी भिगवण येते तब्बल एक किलोमीटर पाठलाग करुन पकडले.
याप्रकरणी आरोपी पळून गेल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात चौघांवर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .संतोष बाळू पवार (26 , रा. पानशेत रोड, खानापूर, ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मार्केटयार्ड परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून 25 लाख रुपयांचा दरोडा अविनाश रामप्रताप गुप्ता व त्याच्या टोळीने टाकला होता. पोलिसांनी या टोळीला पकडल्यानंतर मोक्का लावण्यात आला होता. दरम्यान गुन्हयाचा तपास करण्यासाठी संतोष पवार आणि आणखी एका गुन्हेगारास खानापूर येथे नेले होते. संतोष पवार याच्या घरी तपास सुरु असताना तीघेजण तीथे दाखल झाले. तेथे संतोष पवार याने अचानक हातातील बेडीला झटका मारुन पोलीस कर्मचाऱ्याच्यांपासून सुटका करुन घेतली. तो पळत असताना त्याच्या मागे आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर बेडीने हल्ला चढवला. यानंतर दुचाकीवर बसून पळून जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी पकडली असता, त्याला काही अंतरावर फरफटत नेले. यानंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते सापडू शकले नाही. दरम्यान आरोपीचा शोध हवेली पोलीस आणि मार्केटयार्ड पोलीस करत होते. मार्केटयार्ड पोलिसांना तांत्रीक विश्लेषणात तो भिगवण येथे असल्याची माहिती मिळाली. मात्र पथक भिगवणला जाईपर्यंत आरोपीने त्याची जागा बदलली असती.
बिबवेवाडी पोलिसांचे एक पथक मात्र, त्यांच्याकडे दाखल केले मात्र पथक भिगवणला जाईपर्यंत आरोपीने त्याची जागा बदलली असती. बिबवेवाडी पोलिसांचे एक पथक मात्र, त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपीला शोधण्यासाठी भिगवणला होते. मार्केटयार्ड पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानूसार बिबवेवाडी पोलिसांचे पथक संतोष पवारच्या मागावर केले. पोलिसांना बघुन संतोष पवारणे पळ काढला. पथकाले तब्बल एक किलोमीटर पाठलाग करुन त्याला जेरबंद केले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव आणि पोलीस निरिक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.