मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली होती. या मुलाखतीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही. असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘…तर आज मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती’
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावर संजय राऊत म्हणाले,…
“ती मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही”
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
‘मुख्यमंत्र्यांना सामनाच्या मुलाखतीत एका वर्षात काय केले, पुढची दिशा काय, काहीच सांगता आले नाही. मी यापूर्वी धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते, ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले. ते पुढे म्हणाले , मुख्यमंत्र्यांची सामनामध्ये आलेली मुलाखत ही प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही. ‘
फेसबुक लाईव्ह