मुंबई – कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून बंद दरवाजाआड चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे यांच्या ईडी चौकशीवर आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत या प्रकणाबाबत म्हणाले की,’राज ठाकरे चौकशीला सामोरे जात आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यांनी टाळाटाळ केली नाही ते कुटुंबासह तेथे उपस्थित आहेत. तसेच माध्यमांनी उद्धव ठाकरें यांनी केलेल्या विधानाबाबत म्हणाले की, ते विधान बंधू प्रेमातूनच करण्यात आलं होतं, त्यात कोणताही राजकीय अर्थ नाही, असे राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, राज ठाकरे यांची ईडीकडून होणाऱ्या चौकशीत काही मिळेल असे मला वाटत नाही. त्यामुळे २ दिवस थांबायला काही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ईडी चौकशीवर दिली होती.