भूमिका चावला बॉलिवूडपासून दूर

सलमान खानच्या बरोबर “तेरे नाम’ या हिट सिनेमातून प्रसिद्ध झालेली भूमिका चावला आता बॉलिवूड पासून खूप लांब गेली आहे. भूमिकाने सलमान, अभिषेक बच्चन यासारख्याला मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. पण जितक्‍या लवकर ती प्रसिद्ध झाली तितक्‍या लवकरच पुणे बॉलिवूडमधून एक्‍झिट घेतली आहे. तिच्या 45 व्या वाढदिवसानिमित्ताने तिच्या करिअरचा हा ग्राफ.

मुळची पंजाबी असलेल्या भूमिकाचे खरे नाव रचना चावला आहे. एक्‍टिंगसाठी तिचे नाव बदलून भूमिका ठेवले गेले होते. “तेरे नाम’ च्या अगोदर तिने का तेलगू सिनेमात तिने काम केले होते. त्यानंतर “खुशी’ नावाच्या आणखी एका तेलगू सिनेमासाठी तिला “बेस्ट एक्‍ट्रेस’ चा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर सलमानच्या “तेरे नाम’ ची ऑफर तिला मिळाली. अभिषेक बच्चन बरोबरच्या “रन’या सिनेमालाही तिला चांगली पसंती मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2007 मध्ये भूमिकाने योगशिक्षक भरत ठाकूर बरोबर लग्न केले आणि ती संसारात चांगली रंमली. आता तिने आपल्या बॉलीवूड करिअरला ब्रेक दिला आहे. धोनीचा बायोपिक असलेल्या “एम एस धोनी’ मधून तिने कमबॅक केले होते. पण तो तिचा लीड रोल नव्हता. धोनीच रोल साकारणाऱ्या सुशांत राजपूतची बहिण म्हणून ती दिसली होती. तिने हिंदी आणि तेलगूबरोबर तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी आणि पंजाबी सिनेमांमधूनही काम केले. या सर्व भाषांमधील सिनेमांमध्ये तिचे स्थान पक्के व्हायला लागले असतानाच तिने एक्‍झिट घेतली. आता तिने बॉलीवूडपेक्षा वेब सिरीजमध्ये काम करायला प्राधान्य दिले आहे. पण त्याबाबतचा तपशील अजून पुरेसा मिळालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)