कल्कीने सोशल मिडीयावरच्या कॉमेंट वाचणे सोडले

‘सॅक्रीड गेम्स-2’मध्ये महत्त्वाचा रोल साकारणारी कल्की कोचलीन सध्या सोशल मीडियावर नाराज आहे. सोशल मीडियावरचे कॉमेंट वाचणे तिने बंद केले आहे. मुळची फ्रेंच असलेल्या कल्कीच्या घरात लहानपणापासून मोकळे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी तिला लहानपणापासूनच समजायला लागल्या होत्या. मात्र अलीकडच्या काळात टीव्ही शो आणि वेब सिरीजचे विषयही बदलायला लागले आहेत.

बदलणाऱ्या परिस्थितीतल्या बदललेल्या इंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा कल्कीवर परिणाम झाला आहे. आता लोक काय म्हणतात याचा विचारच ती करत नाही. अगोदर बंडाखोर असलेली कल्की आता थोडी आध्यात्मिक व्हायला लागली आहे. सोशल मीडिया आपल्याला नेहमी लोक काय म्हणतात याचा विचार करायला लावतो. असा विचार करायला लागले की आपल्यालाच जास्त त्रास होतो, असे कल्की म्हणायला लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकांना प्रत्येक गोष्टीवर स्वतःची वेगळी आणि भन्नाट मते मांडायची सवय लागली आहे. त्या कॉमेंट दरवेळी उपयोगी असततच असे अजिबात नाही. त्यामुळे सोशल मिडीयावर एखादी पोस्ट करायची असेल, तर गुपचूप पोस्ट करायची आणि लगेच “लॉग आऊट’ व्हायचे, असे तिने ठरवले आहे. यापूर्वी तिला भूतकाळात रममाण व्हायची सवय होती. आता ती वर्तमनकाळात रहायला शिकली आहे. पण लोकांना एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी आपला वेळ आणि एनर्जी वाया घालवणे योग्य नाही, हे तिच्या चांगले लक्षात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच कल्कीने आपले केसही खूप बारीक कापलेले आहेत. आपल्या या बदललेल्या लूकचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले, तेव्हा अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. या ट्रोलिंगलाही आता कंटाळली आहे. सोशल मीडियावर सतत नकारात्मक पोस्ट आणि कॉमेंट येत असल्याने या कॉमेंट पासून दूर राहण्याचा मार्ग तिने निवडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)