Thackeray on Amit Shah। केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपांना उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलंय. जय शाह याने सचिन आणि विराटला क्रिकेट शिकवलं आहे का? असा खोचक सवाल ठाकरेंनी यावेळी विचारलाय.
उद्धव ठाकरे काय म्हणाले? Thackeray on Amit Shah।
“अमित शाह तोंड वर करुन बोललात, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. बरं करायचं आहे मला मुख्यमंत्री. पण यांनी मतं दिली तर तो होईल ना. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद म्हणजे बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही. अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं जय शाहचं क्रिकेटमधलं योगदान काय? सचिन तेंडुलकरला, विराट कोहलीला त्याने शिकवलंय का? त्याचा काय संबंध आहे क्रिकेटशी? तुम्ही जे कराल ते सगळं चालतं. मात्र जनतेची पोरबाळं त्यांचं काय? त्यांना नोकऱ्या नाहीत, शिक्षण नाही, हाताला का नाही. तुम्ही तुमच्या मुलांचे चोचले पुरवत आहात. लोकांच्या मुलांनी काय करायचं? याचं उत्तर अमित शाह देतील का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
गद्दारांची पोरटोरं यांना चालतात Thackeray on Amit Shah।
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “शिवसेनेतून जे गद्दार तिकडे घेतले त्यांची पोरटोरं आणि त्यांची मस्ती यांना चालते. त्यांची घराणेशाही चालते. बाप मुख्यमंत्री आणि त्याचं कार्ट दुसरं काहीतरी ते चालतं. मोदींना अटलबिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला वाचवलं. त्या शिवसेना प्रमुखांच्या मुलांची घराणेशाही असं तुम्ही म्हणता आणि त्याला गद्दारी करुन खुर्चीवरुन खाली खेचता, हा माझा दोष आहे का?” असाही उद्विग्न सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला.