PM Modi Congratulates Shehbaz Sharif| पाकिस्तनामध्ये शेहबाज शरीफ यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सोमवारी 4 मार्च रोजी त्यांचा शपथ विधी सोहळा पार पडला. शाहबाज हे पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान झाले आहेत. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन केले आहे. एक्स अर्थात ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X अकाऊंटवर लिहिलं की, ‘पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन.’ शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 2022 नंतर त्यांनी दुसऱ्यांदा देशाची सूत्रे हाती घेतली आहेत.
Congratulations to @CMShehbaz on being sworn in as the Prime Minister of Pakistan.
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2024
शाहबाज यांची 3 मार्च 2024 रोजी पंतप्रधानपदी निवड झाली होती. पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत असताना शाहबाज यांनी दुसऱ्यांदा पाकिस्तानची सूत्रे हाती घेतली आहेत. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी 72 वर्षीय शाहबाज यांना राष्ट्रपती भवन ‘ऐवान-ए-सदर’ येथे आयोजित समारंभात पंतप्रधानपदाची शपथ दिली. शेहबाझ शरीफ हे यापूर्वी एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यान पाकिस्तानमधील आघाडी सरकारचे पंतप्रधान राहिले होते. निवडणुकीच्या काही महिने आगोदर संसद विसर्जित करण्यात आली होती. PM Modi Congratulates Shehbaz Sharif|
पीएमएल-एन आणि पीपीपी पक्षांचे मिळून 201 दस्यांची मते शेहबाझ शरीफ यांना मिळाली. एकूण 336 सदस्यांच्या संसदेमध्ये सभागृह नेता होण्यासाठी 169 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असताना शरीफ यांना त्यापेक्षा 32 मते जास्त मिळाली. शेहबाझ शरीफ यांच्या समोर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने पाठिंबा दिलेल्या ओमर आयुब खान यांचे आव्हान होते. त्यांना अवघी 92 मते मिळाली. PM Modi Congratulates Shehbaz Sharif|
हेही वाचा :
‘तारे जमीन पर’ चित्रपटातील जोडी तब्बल 16 वर्षांनंतर येणार एकत्र