sudhakar badgujar – भाजप नेते नितेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय.
नितेश राणे यांनी विधानसभेत या पार्टीचे फोटो दाखवून यावर कारवाईची मागणी केली. दरम्यान, नितेश राणे यांनी केलेल्या मागणीची दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो नितेश राणेंनी सभागृहात दाखवला आहे.
या सर्व प्रकरणावर नितेश राणे यांनी, दाऊदच्या जवळचा मुख्य आरोपी १९९३ च्या ब्लास्टचा आरोपी हा जन्मठेप भोगत आहे. पॅरोलच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक अध्यक्षासोबत पार्टी करतो. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो आणि व्हिडीओ आहेत. 1993 चा बॉम्ब ब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता. यातील आरोपी सलिम कुत्ता हा पॅरोलवर असताना तो पार्टी करतो. उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोबत पार्टी करतो, हे गंभीर आहे. याला कोणाचा पाठींबा आहे.? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हा बेबनाव व्हिडिओ, बडगुजरांनी आरोप फेटाळले –
2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सभा घेतली होती. त्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी मला अटक झाली आणि मी 15 दिवस तुरुंगात होतो. राजकारणमध्ये मी आलो तेव्हा माझ्यावर एक केस ही नव्हती. सलीम कुत्ताला आधीच अटक झाली असेल. त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे आरोप बेबनाव आहेत, मॉर्फिंग केलेले आहेत आणि मला मान्य नाहीत, असं म्हणत बडगुजरांनी आरोप फेटाळले आहेत.
योग्य माहिती घेऊन आरोप करावेत – सुधाकर बडगुजर
जे आरोप केलेत त्याची योग्य माहिती घेऊन आरोप करावते. सलीम कु्त्ता याच्याशी माझा काहीही संबंध नव्हता आणि नाहीये. तो जेलमधून कसा बाहेर आला हे मला माहित नाही. फडणवीस म्हणाले तो पॅरोलवर आला. तो पॅरोलवर आल्यानंतर सार्वजनिक जीवनात आमची कुठे भेट झाली माहिती नाही, असं बडगुजर म्हणाले. यावेळी बोलताना सुधाकर बडगुजरांनी पालकमंत्री आणि प्रफुल पटेलांवर देखील निशाणा साधला. प्रफुल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचं जॉईन वेंचर आहे, त्याचं काय झालं असा सवाल देखील बडगुजरांनी यावेळी उपस्थित केला.