India vs Bangladesh, U19 Asia Cup 2023 Semifinal : आज अंडर-19 आशिया चषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होत आहे. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने आजच होत आहेत. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना यूएईशी सुरू आहे. भारताने ग्रुप स्टेजमधील तीनपैकी दोन सामने जिंकले होते. टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अंडर-19 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ही स्पर्धा जिंकून आपली तयारी मजबूत करण्यासाठी मैदानात उतरला आहे.
अंडर-19 आशिया चषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 42.4 षटकात 188 धावांवर आॅलआऊट झाली.
India-U19 made a total of 188 runs against Bangladesh-U19, while UAE-U19 managed to score 193 runs against Pakistan-U19, setting the ground for an intense low-scoring battle for a spot in the finals!#ACCMensU19AsiaCup #ACC pic.twitter.com/lci1GqWc5g
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 15, 2023
भारतीय संघाची फलंदाजी खूपच खराब झाली. टीम इंडियाने 61 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. आदर्श सिंग दोन धावा करून बाद झाला, अर्शीन कुलकर्णा एक धावा करून बाद झाला, प्रियांशू मोलिया 19 धावा करून बाद झाला. कर्णधार उदय सहारन याला खातेही उघडता आले नाही. सचिन दासने नक्कीच काही चांगले फटके मारले, पण 22 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 16 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला . अरावेली अवनीशलाही खाते उघडता आले नाही.
INDW vs ENGW Test Day 2 : जेमिमासह 4 खेळाडूंची अर्धशतके; भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद 428 धावा…
यानंतर सर्फराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान याने मुरुगन अभिषेकसोबत सातव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. मुशीर आणि अभिषेक या दोघांनी अर्धशतके झळकावली. मुशीर 61 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 50 धावा करून बाद झाला तर अभिषेक 74 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 62 धावा करून बाद झाला. सौमी पांडे 1 धावा करून बाद झाला तर नमन तिवारी 11 धावा करून बाद झाला तर राज लिंबानी 11 धावा करून नाबाद राहिला.
बांगलादेशकडून गोलंदाजीत मारूफ मृधाने सर्वाधिक चार बळी घेतले. तर रोहनत बोरसन आणि शेख जिबोन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. महफुजुर रहमानला एक विकेट मिळाली.