सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत दहशतवादी ठार

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना आज मोठे यश मिळाले आहे. जम्मूच्या त्रालमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याजवळून मोठ्या प्रमाणात असणारा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे.

त्रालमधील सुरक्षा जवानांना परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार परिसरात सापळा रचून दहशतवाद्याला घेरण्यात आले. यानंतर दहशतवाद्याने जवानांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षादलाला यश आले आहे.

दरम्यान,एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच परिसरात सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.