जाधववाडीत आढळताहेत विविध प्रकारचे कीटक

Madhuvan

जाधववाडी – पिंपरी-चिंचवड शहरात शेती ही वास्तव्यासाठी वापरली गेल्याने जाधववाडी परिसरात देखील फार थोड्या नागरिकांकडे शेती शिल्लक आहे. शेती म्हटले की जीवजंतू, विविध प्रकारचे कीटक आपण पाहत असतो. परंतु जाधववाडीत शेतीमध्ये एक कीटक आढळून आल्याने नागरिकांमध्ये त्याविषयी उत्सुकता आहे.

शेती परिसरात विविध कीटक दिसून येतात परंतु आजवर आपण पाहिलेला नाही असाच एक कीटक कपाशीच्या पानावर आढळून आला. तो दिसायला अत्यंत आकर्षक असून, त्याच्या शारीरिक ठेवण देखील आकर्षक आहे.

तोंडाच्या बाजूला धोका ओळखण्यासाठी लांब शिंगासारखे आकडे आहेत. ते त्याला धोक्‍याचा इशारा देत असावेत. त्याच्या मानेवर व संपूर्ण शरीरावर आकर्षक नक्षीकाम असल्याने दिसण्यास चांगला आहे.

परंतु हा कीटक कोणता आहे हे जुणे जाणकार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विचारले असता त्यांना देखील त्याचे नाव अथवा माहिती देता आली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.