कर्तारपूर कोरीडोरच्या जवळ दहशतवाद्यांचे तळ; घातपाताची शक्‍यता

नवी दिल्ली : कर्तारपूर कोरिडोरच्या उद्‌घाटनाला काही दिवस राहीले असतानाच पाकिस्तानातील नरोवाल येथील गुरूद्वारा दरबार साहीबजवळ दहशतवाद्यांचे तळ कार्यरत असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. हे तळ जागतिक दहशतवादी हफिझ महंमद सईद संस्थापक असणाऱ्या जमात- उल- दवा आणि लष्कर- ए- तोयबा या संघटनांमार्फत चालवण्यात येत आहेत.

गुरूद्वारापसून 100 एकर क्षेत्र गुरू नानक देव यांच्या नावे आहे. तेथील अतिक्रमणे अथवा ताबे दूर करावेत, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. मात्र, पाकिस्तानकडून त्याला निराशाजनक प्रतिसाद मिळाला आहे. या भागात दहशतवाद्यांचे तळ आढळून आले आहेत, असे एका वरीष्ठ भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा जिल्ह्यातील मुरीदके येथील दहशतवाद्यांच्या हालचाली बाबत गुप्तचर खात्याने गृहमंत्रालयाला सर्तकतेचा आदेश दिला असून भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची सतर्कता सूचना दिली आहे.

या घटनांवरीन पाकिस्तानने त्यांचा के 2 कट पुन्हा रचला असल्याचे दिसत आहे, त्यात खलिस्तान आणि काश्‍मिरचा समावेश आहे.पाकिस्तानी गुप्तचर खाते आयएसआय भारतात पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीसाठी अतिरेकी घुसवण्याच्या प्रयत्नात आहे, असे सूत्रांनी सांगितले. हे तळ जागतिक दहशतवादी हफिझ महंमद सईद संस्थापक असणाऱ्या जमात- उल- दवा आणि लष्कर- ए- तोयबा या संघटनांमार्फत चालवण्यात येत आहेत. या तळांवर वकाही महिलांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक विवेक कुमार जोहिरी यांना याबाबत सावध करण्यात आले असून सीमे पलिकसडील हालचालींची माहिती देण्यात येत आहे. सीमा तसेच कर्तारपूर टर्मिनल आणि कोरीडोरच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कर्तारपूर कोरीडोरचे उद्‌घाटन शनिवारी (दि. 9) होणार आहे. भारतातील पंजाबमधील डेराबाबा नानक ते पाकिस्तानातील दरबार साहीब गुरूद्वारापर्यंत परिक्रमा व्हिसाशिवाय जरता येणार आहे. पाकिस्तान खलिस्तान लिबरेशन फोर्स, बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान कमांडो फोर्स आणि इंटरनॅशनल शिख युथ फेडरेशन या भारतात बंदी घातलेल्या संघटनांना पुनरूज्जिवित करण्याचे प्रयत्न पाकिस्तान करत आहे. त्यांना आर्थिक आणि शस्त्रांची रसद पुरवत असल्यावे भारताच्या निदर्शणास आले आहे. त्याकडे भारताने पाकिस्तानचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे.

यापुर्वी कुख्यात दहशतवादी हफिज सईदचा जवळचा साथिदार गोपालसिंग चावला यांची कर्तारपूर कोरीडोरच्या 10 सदस्एीेय व्यवस्थापन समितीवर वर्णीलावल्यावबद्दल आक्षेप घेत चिंता व्यक्त केली होती. बिशनसिंग, कुलजितसिंग, मनिंदरसिंग आणि अन्य भारतविरोधी शक्तींना कोरीडोरशी संबंधीत ठेवल्याबाबतही चिंता व्यक्त केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)