मुंबई : गँगस्टर आणि राजकीय नेता अतिक अहमद याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या अगोदर त्याचा मुलगा असद अहमदचा देखील उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. उमेश पाल हत्याकांडप्रकरणात नाव समोर आल्यापासून असद फरार होता. एंकॉउंटरनंतर पोलिसांनी मृत असदचा फोन ताब्यात घेतला होता. या फोनमध्ये पोलिसांना एक भयावह व्हिडीओ आढळला आहे.
या व्हिडीओमध्ये असदचे काही साथीदार एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जानेवारी २०२१ मधील असून एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या असद अहमदच्या मोबाईलमध्ये सापडला आहे. हा व्हिडीओ असद राहत असलेल्या लखनऊच्या एका फ्लॅटमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
उमेश पाल हत्याकांड में मारा गया अतीक अहमद का बेटा असद का वीडियो आया सामने, एक शख्स को नंगा करके बेरहमी से की थी पिटाई, लखनऊ में असद जहां रहता था वहां का बताया जा रहा है वीडियो #AsadAhmedEncounter #AsadAhmed #AtiqAhmed #PoliceEncounter pic.twitter.com/jtix63M80X
— Srivastava Varun (Journalist) (@varunksrivastav) April 24, 2023
असद या व्हिडीओमध्ये दिसत नसला तरी लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्यासाठी तो असे व्हिडीओ बनवत असे, अशी माहिती मिळत आहे. याबाबतचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे.
एक तरुण नग्नावस्थेत फरशीवर बसलेला दिसत आहे. तर काही तरुण पीडित तरुणाला बेल्ट आणि लाथांनी बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ असद अहमदच्या फोनमध्ये आढळला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.