रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, परंतु युद्ध अजूनही संपलेले दिसत नाही. रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये हल्ले करत आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून आजूबाजूला केवळ विनाशच आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान तिसरे महायुद्धही होण्याचा धोका आहे. प्रसिद्ध फ्रेंच प्रेषित ‘मायकल डी नॉस्ट्राडेमस’ यांनी केलेल्या भाकितामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती वाढली आहे. नॉस्ट्राडेमसच्या भाकितानुसार याच वर्षी जगात तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते.
नॉस्ट्राडेमस या संदेष्ट्याने आपल्या पुस्तकात हजारो भविष्यवाण्या केल्या. या पुस्तकात त्यांनी जगात येणार्या विध्वंसाची माहिती दिली. त्याच्या भविष्यवाणीवर जगाचा विश्वास आहे, कारण त्याचे ७० टक्के भाकीत आतापर्यंत खरे ठरले आहेत. तिसर्या महायुद्धाव्यतिरिक्त, नॉस्ट्राडेमसने २०२२ या वर्षासाठीही खूप भीतीदायक भविष्यवाणी केली होती. २०२२ बद्दलच्या भाकितामध्ये त्यांनी विनाशाचे संकेत दिले आहेत.
काय अंदाज आहेत नॉस्ट्राडेमसचे ?
एका मीडिया रिपोर्टनुसार, फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्राडेमस यांचा जन्म १६व्या शतकात झाला होता. यावेळी त्यांनी भविष्यात जगात घडणाऱ्या अनेक घटनांची भविष्यवाणी केली होती. असे म्हटले जाते की त्यांनी वर्तवलेले एक भाकीत रशिया-युक्रेन युद्ध होते जे आता खरे ठरले आहे. नॉस्ट्रॅडॅमसने असेही भाकीत केले की रशिया-युक्रेन युद्ध संपेल, परंतु इतर देशांमधील मतभेद आतल्या आत भडकत राहतील. याचा परिणाम असा होईल की या वर्षी (२०२२ मध्ये) युरोपमध्ये भीषण युद्धाची सुरुवात होईल. हे तिसरे महायुद्ध असेल हे स्पष्ट आहे.
सात महिने चालणार युद्ध
तिसरे महायुद्ध सुमारे सात महिने चालेल, असे नॉस्ट्राडेमसने आपल्या भविष्यवाणीत म्हटले होते. या युद्धात लाखो लोक मरतील. नॉस्ट्राडेमसच्या मते, तिसऱ्या महायुद्धात जगातील अनेक देशांचे अस्तित्व संपुष्टात येईल. या लढाईत जे टिकतील ते नव्याने आयुष्याला सुरुवात करतील. त्यामुळे जगात नवे महायुद्ध सुरू होणार आहे. अहवालानुसार, नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार, २०२२ मध्ये युरोपमध्ये युद्ध सुरू होईल. हे युद्ध हळूहळू तिसऱ्या महायुद्धात रूपांतरित होईल. यानंतर अनेक देश या युद्धात सामील होतील.
नॉस्ट्राडेमसचा मृत्यू
नॉस्ट्राडेमसने ४५० वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. त्यांनी सुमारे ६,३३८ भाकिते केली होती, त्यापैकी ७० टक्के भाकिते आतापर्यंत खरी ठरली आहेत.
करोना व्हायरसचा अंदाज ठरला खरा
नॉस्ट्रॅडॅमस यांनी २०२० मध्ये करोना महामारीचा उद्रेक होण्याची भविष्यवाणी केली होती. करोना महामारीची भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यावरून असे मानले जाते की त्याने भविष्यासाठी केलेले भाकीत देखील खरे ठरू शकतात.