तेल अलिव – इराणने आज इस्रायलवर ड्रोनचा जोरदार हल्ला केला. मात्र आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या जोरावर इराणचा हा हल्ला यशस्वीपणे परतवल्याचा दावा इस्रायलने केला आहे. दरम्यान, एअर इंडियाने रविवारी तेल अवीवची उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
तसेच भारतीय दुतावासाकडून नवीन मार्गदशक सूचना जारी करण्यात आली असून भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. इराणने रात्रभर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी एक नवीन महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
यात इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना शांत राहण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी ते इस्रायली अधिकारी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांच्या संपर्कात आहे.
तसेच भारतीय नागरिकांना दिलेल्या लिंकवर दूतावासात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी तेहरानमधील भारतीय दूतावासाने अतिरिक्त हेल्पलाइन क्रमांक सक्रिय केले आहेत.
कोणत्याही मदतीसाठी +989128109115; +989128109109; +989932179567; +989932179359; +98-21-88755103-5 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे भारतीय दूतावासाने त्यांच्या अधिकृत X हँडलवर नमूद केले आहे.