पुणे :- पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी व सोलींको प्रायोजित 12, 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए मानांकन महाराष्ट्रीय मंडळ ओपन ब्रॉंझ सिरीज 2023 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात वीरा हरपुडे, मोहक कुलकर्णी, जान्हवी सावंत, कनिष्का सिंग यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित वीरा हरपुडेने नवव्या मानांकित श्रीजा कलशेट्टीचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. पाचव्या मानांकित मोहक कुलकर्णीने शरण्या सावंतवर 6-3 असा विजय मिळवला.
तिसऱ्या मानांकित जान्हवी सावंतने अनन्या बिलगीकरचे आव्हान 6-0 असे संपुष्टात आणले. सहाव्या मानांकित कनिष्का सिंगने सायना दीक्षितला 6-3 असे पराभूत केले. 14 वर्षांखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अर्णव पांडे, रोहन बोर्डे, वैष्णव रानवडे, आदित्य जोशी, अमोघ पाटील, अर्जुन पाटोळे, सय्यम पाटील, अंशुल पुजारी यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.