वाई -वाई पोलीस ठाण्यातील 17 पोलीस व त्यंच्या नातेवाइकांसह नावेचीवाडी येथील नगरसेविका व तिच्या कुटुंबातील आठ जणांना करोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. यामधील दहा पोलिसांनी करोनाशी यशस्वी लढा दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.
वाई तालुक्यात गुरुवारी आलेल्या रिपोर्टनुसार 14 जण बाधित झाले असून रुग्णांचा एकूण आकडा 337 वर पोहोचला आहे. सद्य स्थितीत 148 रुग्णांवर उपचार सुरू असून 179 जण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील दहा लोकांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, बावधनमधील 59 वर्षीय महिला, धर्मपुरीतील 10 वर्षांचा मुलगा, 46 वर्षीय पुरुष, भुईंज येथील 15, 53, 51 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला व 11 वर्षांची मुलगी, शेंदुरजणे येथील 80 वर्षीय महिला, 73, 45 वर्षीय पुरुष व 14 वर्षांचा मुलगा, पाचपुतेवाडीतील 25 वर्षीय युवक, असे 14 जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाऊन असून, तेव्हापासून पोलीस व होमगार्डस्नी शहरात बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस कर्मचारी बाधित झाल्याने कामाचा ताण वाढला होता. सध्या शहरात 30 पोलीस कर्मचारी, 29 होमगार्डस्च्या माध्यमातून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून बुधवारी (दि. 22) साडेअकरा हजार रुपये दंड वसूल केला आहे. पोलीस करोनामुक्त झाले, ही समाधानाची बाब आहे.
आनंदराव खोबरे , पोलीस निरीक्षक, वाई.