तेजपूर: मेघालयचा युवा ऑफ स्पिन गोलंदाज निर्देश बैसोया नावाच्या गोलंदाजाने 16 वर्षांखालील विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेत नागालॅंडचा संपूर्ण संघ बाद केला.
1999 साली नवी दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा महान लेगस्पीन गोलंदाज अनिल कुंबळेने पाकिस्तानचे सर्व गडी बाद केले होते, त्याच्या कामगिरीशी बैसोयाने देशांतर्गत स्पर्धेत बरोबरी केली.
मूळचा मेरठचा असलेल्या बैसोयाने 21 षटके गोलंदाजी करताना 51 धावांच्या बदल्यात नागालॅंडचे सर्वच्या सर्व 10 गडी बाद केले.
तसेच कूचबेहार करंडक क्रिकेट स्पर्धेत देखील अशीच कामगिरी यापूर्वी मणिपूरचा मध्यमगती गोलंदाज रेक्स सिंग याने केली होती.