दिवशी बुद्रुक येथील षीकेश थोरातचा ओढ्यातील पाण्यातून वाहून जावून मृत्यू झाल्याचे समजताच आ. शंभूराज देसाईंनी थोरात कुटुंबियांची आचारसंहिता काळातच भेट घेवून कुटुंबाला शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार केवल पंधरा दिवसांत आ. देसाईंनी थोरात कुटुंबियांना चार लाखांची मदत मंजूर करुन दिली.
सणबूर – पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथे आजोबांबरोबर शेतात गेलेला षीकेश संदीप थोरात हा 5 वर्षांचा मुलगा ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेल्याने मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळे ऋषिकेशच्या कुटुंबियांना एकूण 4 लाख रुपयांची मदत शासनामार्फत मंजूर झाली आहे.
या मदतीचा धनादेश आ. देसाईंच्या हस्ते नुकताच थोरात कुटुंबियांना देण्यात आला. यावेळी तहसीलदार रवींद्र माने, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, दादासो जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटण विधानसभा मतदारसंघात दि. 20 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमध्ये ओढ्यांना पाणी आले होते. दिवशी बुद्रुक येथील षीकेश संदीप थोरात हा 5 वर्षाचा मुलगा आपल्या आजोबांबरोबर शेतात गेला असताना त्याचा हात निसटून तो ओढ्यात वाहून जावून मृत झाला होता.
यावेळी थोरात कुटुंबियांची आ. शंभूराज देसाईंनी तात्काळ भेट घेवून या कुटुंबियांना शासनामार्फत तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत तहसिलदार रवींद्र माने यांना मदतीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आ. देसाईंच्या विशेष प्रयत्नामुळे थोरात कुटंबिंयाना शासनाने 4 लाख रुपयांची तातडीची मदत मंजूर केली. ही मदत आ. देसाई यांनी थोरात कुटुंबियांना दिवशी बुद्रुक येथे घरी जावून सुपूर्द करण्यात आला.