मुंबई – बिग बॉस फेम आणि टीव्ही अभिनेत्री सुंबूलचे वडील तौकीर खानही तिच्या येवढेच प्रसिद्ध आहे. तिचे वडील लवकरच लग्न करणार आहेत. तौकीर खान यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अभिनेत्री सुंबुल स्वःताच सोशल मीडियावर लाईव्ह येत सांगितले आहे. जेव्हा सुंबूल 6 वर्षांची होती तेव्हा तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. सुंबुलचे वडील तौकीर हसन खान यांनी दोन्ही मुलींचे संगोपन केले आणि त्यांना अभिनयासाठी प्रेरित केले. 19 वर्षीय सुंबूल खानचे वडील तौकीर खान पुढील आठवड्यात लग्न करणार आहेत.
तौकीर खानच्या भावी पत्नीचे नाव निलोफर आहे. तौकीर खानची भावी पत्नी देखील घटस्फोटित आहे. काही काळापूर्वी त्यांचा घटस्फोटही झाला असून त्यांना एक मुलगी आहे.
यावेळी सुंबुल तौकीर म्हणाली, ‘मी माझ्या वडिलांसाठी खूप आनंदी आहे. मी या दोघांचे माझ्या कुटुंबात स्वागत करते. फक्त आईच नाही तर तिच्यासोबत आम्हाला लहान बहीणही मिळत आहे. आम्ही सर्व उत्सुक आहोत. माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली आहे. मी आणि माझी धाकटी बहीण पप्पांसाठी खूप आनंदी आहोत.’