गेल्या काहिओ दिवसांपासून अभिनेत्री कृती सेनन आणि प्रभास चा चित्रपट आदिपुरुषची चर्चा जोरात सुरु आहे. अशात आता नितेश तिवारी यांनी रामायण चित्रपटाच्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली आहे. रामायण या चित्रपटाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे, रामायण चित्रपटाच्या शूटींची सुरुवात वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात होणार आहे, रामायण चित्रपटामध्ये आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी जोडी एकत्र दिसणार आहे..
रिपोर्ट नुसार, रामायण चित्रपटासाठी नितेश तिवारी यांनी आलिया आणि रणबीर फायनल केले आहे. या चित्रपटात आलिया सीतेच्या तर रणबीर रामाची भूमिका साकारणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच नितेश आणि आलिया यांचा भेटीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. मात्र याबाबत कुठलीही ऑफिशयल अनाउंसमेंट करण्यात आलेली नाही.
राम आणि सीतेनंतर यशला या चित्रपटात रावणाच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे. आलिया, रणबीर आणि यश स्टारर चित्रपटाची घोषणा यंदाच्या दिवाळीला होऊ शकते. यापूर्वी आलिया भट्ट ‘आरआरआर’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसली होती. आलियाने तिच्या चांद हरीण या व्यक्तिरेखेतून चाहत्यांच्या मनावर खोलवर छाप पाडली. यानंतर चाहत्यांनी तिला सीतेच्या भूमिकेत पाहण्याची मागणी केली. चाहत्यांची मागणी दिग्दर्शकापर्यंत पोहोचल्याचे दिसते. ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टला एकत्र पाहण्यासाठी कोण उत्सुक आहे?