Raj Thackeray । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18 वा वर्धापन दिन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित आज नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला.
नाशिक हा मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं असून, तुफान फटके बाजी केली.
दरम्यान, मनसेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. आपल्या सोशल मीडियावर अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.
मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त तेजस्विनी पंडितची खास पोस्ट । Tejaswini Pandit
तेजस्विनीने राज ठाकरे यांचा एक फोटो इंस्टास्टोरीवर शेअर केला आहे. राज ठाकरेंचा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,”18 वर्ष जिद्द आणि चिकाटीची… पुढील वाटचालीस नेहमीप्रमाणे शुभेच्छा !!”. तसेच तिने ‘#वर्धापनदिन’ दिला आहे. । Tejaswini Pandit