नवी दिल्ली :- भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी जीवाचे रान करत असलेल्या यजुवेंद्र चहलने आपल्याला संयम वाढीसाठी बुद्धिबळाची खूप मदत झाल्याचे म्हटले आहे.
क्रिकेटपटू होण्यापूर्वी मी एक बुद्धिबळपटू होतो. त्यामुळे चिकाटी व संयम हे गुण माझ्यात उपजत आहेत. त्याचा लाभ मला क्रिकेटमध्येही झाला व होतही आहे.
सध्या जरी मी एकदिवसीय व टी-20 क्रिकेट खेळत असलो तरीही एक दिवस मला भारताच्या कसोटी संघातही स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी माझे प्रयत्नही सुरू आहेत.
मात्र, त्यासाठी खूप संयम आवश्यक आहे. हाच संयम मला बुद्धिबळाच्या खेळामुळे मिळतो. याच खेळामुळे आपण मानसिकरीत्या भक्कम राहु शकतो व कितीही काळ प्रतीक्षाही करू शकतो, असे चहल म्हणाला.