Dainik Prabhat
Sunday, May 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

विश्वकरंडकासाठी टीम इंडियाची आज घोषणा

by प्रभात वृत्तसेवा
April 15, 2019 | 9:11 am
A A

पुण्याचा केदारची निवड ऐतिहासिक ठरणार

– प्रा. संजय दुधाणे

पुणे – सध्या देशात निवडणूक आणि आपीएल वारे वाहत असले तरी जगभरातील क्रिकेट शौकिनांना विश्‍वकरंडक स्पर्धेची उत्कंठा लागली आहे. क्रीडाविश्वातील भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा 30 मे ते 14 जुलै 2019 दरम्यान इंग्लंड व वेल्समध्ये रंगणार असून भारतीय संघाची घोषणा सोमवारी 15 एप्रिल रोजी होत आहे. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि कोणाची अंतिम 15 संघात वर्णी लागणार याकडे साऱ्या क्रिकेटविश्‍वाचे लक्ष वेधले आहे.

गत स्पर्धेत अजिंक्‍य रहाणे हा एकमेव मराठमोळा खेळाडू होता. यंदा केदार जाधव हा मराठमोळा क्रिकेटपटू प्रथमच विश्‍वकरंडच्या भूमीत झळकताना दिसेल. केदारची निवड ही पुण्यासाठी व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकरीता ऐतिहासिक असणार आहे. कारण तो विश्‍वकरंडक खेळणारा पहिलाच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा खेळाडू ठरणार आहे. प्रथमच पुण्याचा चेहरा विश्‍वकरंडक स्पर्धेत दिसणार आहे. संधीचे सोने करण्यासाठी केदारनेही कंबर कसली आहे. धोनीसोबत मॅचविनरच्यी भूमिका तो ब्रिटिश मैदानातही करताना दिसेल. मधल्या फळीतील केदारला विजय शंकरकडून भिती असेल. केदार की शंकर असा पेच निवड समितीला सोडवावा लागणार आहे.

क्रिकेट पंढरीत होणाऱ्या क्रिकेट कुंभमेळ्यासाठी सर्वप्रथम न्यूझिलंडने आपला संघ जाहिर केला आहे. आता सोमवारी भारताचे शिलेदार सज्ज होतील. विश्‍वकरंडकाच्या मोहिमेसाठी टीम इंडियाचे नेतृत्व प्रथमच विराट कोहलीच्या हाती येईल. गत स्पर्धेतील महेंद्रसिंग धोनीसह, आयपीआय गाजवित असलेला रोहित शर्मा, शेखर धवन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी हे अनुभवी पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणात झुंजताना दिसतील.

वानखेडे स्टेडियमवर 2011 मध्ये षटकार झळकावित महेंद्रसिंग धोनीने दुसर्यांदा विश्वकरंडकावर भारताचे नाव कोरले होते. पुन्हा धोनीचे नेतृत्व असफल ठरले. गत स्पर्धेत कांगारूंनी उपांत्यफेरीतच आपले रथ रोखला होता. गेल्या चार वर्षांत टीम इंडियाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. नव्या दमाच्या खेळाडूंनी भारतीय संघ यंदाही विजेतेपदाचा दावेदार आहे. टीम इंडिया पुन्हा जोशात आहे. भले शेवटच्या एकदिवसीय मालिकेत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले असले तरी.

भारतररत्न सचिन तेंडुलकरचे विश्वकरंडकाचे स्वप्न साकार करणारा धोनी तिसर्यांदा विश्वकरंडकच्या मैदानात दिसणार आहे. धोनीने निवृत्त व्हावे अशी बोचरी टिका सतत होत असताना त्याने आपण संघासाठी कितपत फायदेशीर आहोत हे ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड दौर्यात दाखवून दिले आहे. धोनी चौथ्यांदा विश्वकरंडक स्पर्धेत चमक दाखविण्यास उत्सुक आहे. तोच संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू असल्याने त्याच्यावर संघाची मोठी भिस्त असेल.

मधल्या फळीत धोनीसोबत खेळाता पुण्याच्या केदार जाधवनेही आपली संघातील जागा मजबूत केली आहे. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद समोर चौथ्या क्रमांकासाठी कोणाला निवडायचे हे मोठे आव्हान आहे. आयपीएलमध्ये धडाकेबात कामगिरी करणारा के. एल. राहुल हा चौथ्या स्थानासाठी योग्य खेळाडू असल्याने लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी मत व्यक्त केले आहे. तरी कोहलीची चौथ्या स्थानाकरीता पसंती ही अम्बाती रायडूला असण्याची शक्‍यता आहे. गत विश्वकरंडक स्पर्धेचा अनुभव पाठीशी असणारा दिनेश कार्तिकही चौथ्यासाठीचा खेळाडू ठरू शकतो. गेल्या वर्षभरात त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याने रायडू किंवा राहुलच्या नावाचा विचार अधिक होण्याची शक्‍यता आहे. राहुल, कार्तिक आणि ऋषभ पंत हे तिघेही यष्टीरक्षक असल्याने या तिघांपैकी एकाचाच विचार पर्यायी खेळाडू तसेच यष्टीरक्षक म्हणून केला जाणार आहे.

निवड समितीच्या यादीत मुंबईचा पृथ्वीराज शॉ आणि दिल्लीचा जलदगती गोलदांज नवदिप सैनी हे डार्क हॉर्स आहेत. इंग्लंडच्या लहरी हवामानात खेळताना तीन वेगवान, एक फिरकीसह एक अष्टपैलू अशी विराट ही व्युहरचना असेल. यासाठी अष्टपैलू म्हणून पुण्याच्या केदार जाधव हे नाव पुढे येईल. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड दौरा गाजविणारे यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, जसप्रित बुमराह यांच्यावर मोठी भिस्त असणार आहे.

जगभरातील 10 संघाची रणधुमाळी मे महिन्याच्या अखेरीस ब्रिटिश भूमीत सुरू होईल. 5 जूनचा भारताची दक्षिण आफ्रिकेची सलामी असली तरी पाकिस्तान विरूध्दची झुंजही भारतासाठी अधिक लक्षवेधी ठरणार आहे. 9 संघाविरूध्द लढा देत 14 जुलै रोजी क्रिकेट पंढरी लॉर्डस्वर भारत खेळताना दिसो व कपिल देवप्रमाणे विराटही लॉर्डस्वर विश्वकरंडक उंचविताना दिसेल, त्यापूर्वी संभाव्य 15 खेळाडू कोण याचे उत्तर आपल्या हाती येण्यास काही घटिकाच राहिल्या आहेत.

संभाव्य भारतीय संघ – विराट कोहली – कर्णधार , रोहित शर्मा – उपकर्णधार, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी – यष्टीरक्षक, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी
राखीव – विजय शंकर, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा / अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, लोकेश राहुल

Tags: 2019 cricket World Cupsports newsteam india announced

शिफारस केलेल्या बातम्या

क्रिकेट विश्वाला आणखी एक हादरा; ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
Top News

क्रिकेट विश्वाला आणखी एक हादरा; ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

2 weeks ago
हॅप्पी बर्थडे अझहर : जगातील सर्वात आकर्षक फलंदाजाचे 5 खास विक्रम
क्रीडा

हॅप्पी बर्थडे अझहर : जगातील सर्वात आकर्षक फलंदाजाचे 5 खास विक्रम

4 months ago
IND vs WI ODI : सर्वाधिक धावा करणारे 3 भारतीय फलंदाज
latest-news

IND vs WI ODI : सर्वाधिक धावा करणारे 3 भारतीय फलंदाज

4 months ago
क्रिकेटपटू ते ग्रँडस्लॅम विजेती; असा आहे ‘अ‍ॅश बार्टी’चा रंगतदार प्रवास….
Top News

क्रिकेटपटू ते ग्रँडस्लॅम विजेती; असा आहे ‘अ‍ॅश बार्टी’चा रंगतदार प्रवास….

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

काउंटी क्रिकेट लाभदायक ठरले – पुजारा

ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय,’एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन’

राज्यात ओमायक्रॉनच्या व्हेरियंटचे रुग्ण सापडल्यानंतर आरोग्यमंत्री म्हणाले,”पुढील काही दिवस…”

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; भाजप प्रवक्त्या नूपूर शर्मांविरोधात तक्रार दाखल

असदुद्दीन ओवेसींचा पवारांना स्पष्टच सवाल; म्हणाले,”नवाब मलिक संजय राऊतांपेक्षा कमी आहेत का?”

पुणे : क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको

पुणे : कुलगुरूपदाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्ह!

पत्नी नांदण्यास न आल्याने विनापोटगी घटस्फोट

पुणे: नवीन शिक्षण धोरण हे “ज्ञान दस्तऐवज’

पुणे : सणस मैदानासमोरील रस्ता खचला

Most Popular Today

Tags: 2019 cricket World Cupsports newsteam india announced

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!