तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालय जागतिक जल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन क्लबच्या प्रा. सोनाली पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सोबान आलम होते.
त्यांनी आपल्या मनोगतात जल पातळीचे घटते प्रमाण व त्याचे दुष्परिणाम ग्लोबल वॉर्मिग बद्दल माहिती दिली. कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे होत्या. त्यांनी जल संवर्धन काळाची गरज याबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. ज्योती रणदिवे यांनी हवामानाबाबत ऑनलाईन कोर्सबाबत जाणीव करून दिली.
पाणी बचतीचे महत्त्व आणि पाणीबचत ही पुढच्या पिढ्यांसाठीची पाण्याची उपलब्धता आहे, असे दिपक पवारयांनी सांगितले. विद्यार्थिनींनी ग्रीन क्लब भित्ती पत्रक प्रदर्शित करून पाणी बचत व हवामान बदलाबाबत जागृती केली.
सूत्रसंचालन शिल्पा गवळी यांनी केले. आभार कृष्णा भंडारी यांनी मानले. प्रा. महादेव सांगळे, डॉ कविता तोटे, डॉ. संदीप गाडेकर, डॉ. शीतल देवळालकर, ग्रंथपाल सुजाता जाधव यावेळी उपस्थित होत्या.