टीडीपी नेता चंद्रबाबू नायडूंना मुलासह नजरकैद

नवी दिल्ली : तेलगु देसम पक्षसचे प्रमुख एन.चंद्रबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांना सरकारने नजरकैदेत ठेवले आहे. आंध्रप्रदेशमधील टीडीपी नेत्याच्या हत्येच्या विरोधात आज चंद्रबाबू नायडू शक्‍तीप्रदर्शन करणार होते त्याच पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी नायडु यांना त्यांच्या मुलासह त्यांना घराबाहेर निघण्यास सक्‍त मनाई केली आहे. तसेच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

चंद्रबाबू नायडु यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे, त्याचा विरोध म्हणून नायडु यांनी आपल्या घरातच सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 पर्यंत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाच्या पाठिंब्यासाठी नायडू यांचे समर्थक त्यांच्या घराकडे जात आहेत. दरम्यान, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे तर काहींना अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या अगोदर टीडीपीचे महासचिव आणि एमएलसी नारा लोकेश अथमाकुरमध्ये होत असलेल्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी निघाले होते त्यावेळी त्यांना अडवण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी परिसरात 144 कलम लागू केले आहे. तसेच पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनादेखील नजरकैदेत ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.