मनसेच्या शहराध्यक्षपदी चिखले यांची पुन्हा वर्णी

पिंपरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी सचिन चिखले यांची मंगळवारी फेरनियुक्ती करण्यात आली. तर, नव्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना या विंगच्या शहराध्यक्षपदी रूपेश पटेकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंगळवारी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. किरकोळ बदल वगळता जुन्याच कार्यकारिणीला पुन्हा संधी देण्यात आली आहे. बैठकीला मनसेचे नेते अनिल शिदोरे, पिंपरी-चिंचवड शहर प्रभारी किशोर शिंदे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे आदी उपस्थित होते.

कार्यकारिणीचे नियुक्‍तीपत्र ठाकरे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चिखले व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. तर, पटेकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडे यांनी नियुक्‍ती पत्र दिले. सविस्तर शहर कार्यकारिणी : उप-शहराध्यक्ष : विशाल मानकरी (भोसरी विधान सभा), बाळा दानवले (पिंपरी विधानसभा), राजू सावळे (चिंचवड विधानसभा). शहर सचिव – राहुल जाधव, रूपेश पटेकर. विभाग अध्यक्ष – अंकुश तापकीर (भोसरी विधानसभा), दत्ता देवतरासे (पिंपरी विधानसभा), मयूर चिंचवडे (चिंचवड विधानसभा).

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×