Bollywood News – अभिनेत्री तनिषा मुखर्जीने 2003 साली तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर ती ‘नील एन निक्की’ आणि ‘टँगो चार्ली’मध्ये दिसली. मात्र अनेक चित्रपट करूनही ती एक उत्तम अभिनेत्री म्हणून पुढे येऊ शकली नाही. तनिषाला तिची बहीण काजोल आणि मेहुणा अजय देवगणप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावता आले नाही. याचे तिला खूप पश्चाताप होते अशात ‘झलक दिखला जा’मध्ये याबाबत तनिषाने खुलासा केला.
View this post on Instagram
‘झलक दिखला जा’चा 11वा सीझन सुरू होत आहे. आणि यावेळी तनिषा देखील याचा एक एक भाग आहे. सोनी टीव्हीने आगामी भागाचा प्रोमो रिलीज केला, यात तनिषा मुखर्जी तिच्या अभिनयानंतर भावूक होताना दिसली. या प्रोमोमध्ये तनिषा तिच्या करिअरच्या प्रवासाविषयी बोलताना दिसत आहे.
सोनी टीव्हीने सोमवारी ‘झलक दिखला जा 11′ चा प्रोमो रिलीज केला. व्हिडिओमध्ये तनिषा ‘रईस’ चित्रपटातील ‘लैला में लैला’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. शोचे जज मलायका अरोरा, फराह खान आणि अर्शद वारसी तिच्या नृत्य कौशल्याने खूप खूश दिसत आहेत. फराह तिला “आज तू स्टार आहेस” असे सांगताना दिसते. हे ऐकून तनिषा भावूक होते आणि म्हणते, “माझ्या कुटुंबात अजय देवगण, काजोल हे सगळे स्टार आहे, मी तिथपर्यंत पोहोचले नाही. मी स्टार नाही.”
एका जुन्या मुलाखतीत बोलत असताना, तनिषा मुखर्जीने तिच्या प्रवासाबद्दल सांगितले होते, की,’ ती तिची बहीण काजोल आणि आई तनुजा इतकी प्रसिद्धी का मिळवू शकली नाही, कारण तिच्या स्वतःबद्दलच्या भावना कधीच तीव्र नव्हत्या. तर काजोल आणि तनुजा अशा व्यक्ती आहेत ज्यांच्यात आत्मविश्वास भरलेला आहे.’
‘झलक दिखला जा 11’चा प्रीमियर 11 नोव्हेंबरला सोनी टीव्हीवर होणार आहे. या डान्स रिअॅलिटी शोमध्ये तनिषाव्यतिरिक्त उर्वशी ढोलकिया, शोएब इब्राहिम, अंजली आनंद, शिव ठाकरे, आमिर अली, संगीता फोगट, राजीव ठाकूर, अद्रिजा सिन्हा, करुणा पांडे आणि श्रीराम चंद्रा सहभागी होणार आहे.