Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या ड्रेसिंग स्टाइमुळे नेहमीच चर्चेत राहते. अनेकदा तिला कपड्यांवरून ट्रोल केले जाते. नुकतेच मलायकाने हटके फोटोशूट केले आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र यावेळीही मलायकाला ट्रोल करण्यात आले आहे.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये मलायका फारच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये मलायका अरोराने निऑन रंगाचा श्रग घातला आहे. तिने हे श्रग समोरच्या बाजूने उघडे ठेवले आहे. मलायकाने वेगवेगळ्या रंगाच्या चमकत्या टिकल्यांनी तयार केलेला स्कर्ट घातला आहे. त्याचसोबत तिने निऑन कलरचे हिल्स कॅरी केले आहेत. मलायका या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अनेकांना तिचा हा लुक आवडला आहे. तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे.
View this post on Instagram
काहींनी या फोटोशूटनंतर मलायकची तुलना उर्फी जावेदसोबत केली आहे. अनेक जण तिला उर्फीची बहीण म्हणत आहेत. ‘द नेक्स्ट उर्फी, ‘उर्फीची नवीन बहीण,’ ‘उर्फीसुद्धा हिच्यासमोर अपयशी ठरली,’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मलायकाने हे फोटोशूट अमित अग्रवालसाठी केले आहे. अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीच्या लूकचे कौतुक केले आहे. दरम्यान, वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायकाचे सौंदर्य तरुणींना लाजवेल असे आहे. आजही तिच्या सौंदर्याची आणि स्टाइलची चर्चा रंगलेली दिसते.