तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी पहिला ‘तान्हाजी’ 

नवी दिल्ली : तान्हाजी ‘द अनसंग वॉरियर’ चित्रपटाद्वारे अजय देवगनने बॉक्स ऑफिसवर यावर्षीचा पहिला ब्लॉकबस्टर दिला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दरम्यान, देशातील तीन सैन्य दलाचे प्रमुखही हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहात पोहोचले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

19 जानेवारी रोजी संध्याकाळी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदल प्रमुख एडमिरल करंबीर सिंह, एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौर्य यांनी हा चित्रपट दिल्लीच्या पीव्हीआर येथे पाहिला. या खास प्रसंगी अजय देवगणही उपस्थित होते. हा फोटो नेव्हीचे माजी अधिकारी हरिंदर सिक्का यांनी ट्विट केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.