मुंबई – देशाचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांनी दोन दिवसांपूर्वी आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. पंतप्रधान मोदी यांचा जन्म 17 सप्टेबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये झाला. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षावर झाला. राजकर्त्ये, क्रीडापटू, चाहते यांच्यासह बॉलिवूड सेलीब्रिटींनीही मोदींना विशेष संदेश पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, यातील काही लोकांना स्वतः हा पंतप्रधांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रिप्लाय सुद्धा केला आहे. यात बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता ‘अजय देवगण’चा देखील समावेश आहे. अजय देवगणने पंतप्रधान मोदींना ट्वीटरवरुन त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या.
Delighted to receive your wishes. Was good seeing young Yug devoting his birthday towards a greener planet. Such awareness is commendable. @ajaydevgn https://t.co/XhjliMVHgj
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2020
त्यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी अजयचे आभार व्यक्त केले आहेत. सोबतच अजय देवगणचा मुलगा युगचं देखील कौतुक केलं आहे. मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आपल्या शुभेच्छा मिळाल्या. युग आपल्या वाढदिनी पृथ्वीला हिरवंगार करण्यासाठी काम करत होता. ही जागरुकता कौतुकास्पद आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.
Working towards a Green tomorrow. Cannot ask for more. Happy Birthday 🥳 Yug. And, lots more to come. pic.twitter.com/y5FFFQHYLa
— Ajay Devgn (@ajaydevgn) September 13, 2020