वृत्तसंस्था – कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेत जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे आज उपचारादरम्यान निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हेलिकॉप्टर दुर्घटने एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन यांच्यावर गेल्या 7 दिवसांपासून बेंगळुरू येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Group Captain Varun Singh, the lone survivor of #TamilNaduChopperCrash – who was under treatment at Command Hospital in Bengaluru – passes away at the hospital. pic.twitter.com/l8XsiihL5k
— ANI (@ANI) December 15, 2021
८ डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग एकमेव बचावले होते. ग्रुप कॅप्टन सिंग यांच्यावर बेंगळुरू येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांच्या तब्बेतीत चढ-उतार होत असताना त्यांचे आज निधन झाले आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 लष्करी अधिकारी या हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले होते. या अपघातात एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले होते मात्र ते गंभीर जखमी झाले होते. अखेर आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.