मुंबई – यावर्षी “द गर्ल ऑन ट्रेन’, “सानिया’, “संदीप और पिंकी फरार’ सारख्या सिनेमांमधून दिसलेली परिणिती चोप्रा आता टीव्हीवर दिसणार आहे. करण जोहर आणि मिथुन चक्रवर्ती समवेत ती एका कार्यक्रमामध्ये दिसणार आहे.
स्वतः परिणितीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून ही माहिती दिली आहे. तिने या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी खूपच लांबलचक ट्विट केले आहे. हा एक टॅलेन्ट रिऍलिटी शो असणार आहे.
त्यामध्ये करण जोहर आणि मिथुन चक्रवर्तीसह परिणिती चोप्रा जज म्हणून दिसणार आहे. परिणितीने 2011 साली लेडीज व्हर्सेस रिक्की बहलमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीसाठीचा पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही तिला मिळाला होता. या नवीन टीव्ही शो व्यतिरिक्त परिणिती उंचाईमध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणींसोबत दिसणार आहे.
याच सिनेमातील एका शूटिंगसाठी 11 हजार फुटांवरच्या एका गावात गेल्यावर तिने तिथल्या लहान मुलींबरोबर फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला होता. याचा एक व्हिीडीओ तिने
इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याशिवाय रणबीर कपूरबरोबर ऍनिमलमध्येही ती असणार आहे. यामध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल हे लीड रोलमध्ये असणार आहेत.