कै.पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या वतीने ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना प्रदान करताना खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रविंद्र धंगेकर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे व पदाधिकारी.
हडपसर – तमाशा कलावंतांच्या मुलांना मोफत शिक्षण, आरक्षण आणि नोकरी मिळावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिले. बालगंधर्व रंगमंदिर येथे कै.पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आयोजित पुणे लावणी महोत्सव २०२३ तसेच पठ्ठे बापूराव पुरस्कार वितरण समारंभात खासदार श्रीनिवास पाटील बोलत होते.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, महोत्सवाचे अध्यक्ष मित्रावरून झांबरे, डॉ.शंतनु जगदाळे, सत्यजित खांडगे, कृष्णा ढेरंगे, कुमार अवताडे, संदीप घुले, अजित ठाकूर आदिंसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मिलापचंद गायकवाड, हवेली तालुका तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास गायकवाड, सोसायटीचे चेअरमन अमर गायकवाड आदी उपस्थित होते.
खासदार पाटील पुढे म्हणाले की, तमाशाला दाद देणारे आता कमी झाले आहेत. कलावंतांना मानधन देताना पाटलांनी लाज बाळगू नये. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानकडून हा कार्यक्रम यापुढेही असाच चालू राहावा. पेशवाईतील लावणी पुढे वाढत गेली. कलावंताचा आश्रय दाता व्हावं. तमाशाचा आता ऑर्केस्ट्रा झाला आहे. लावणी जपण्याचे काम जिंतिकरांनी केले. दरम्यान, यावेळी खासदार श्रीनिवास पाटील व आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत पुरस्करांचे वितरण करण्यर आहे. सूत्रसंचालन दिपक वाघमारे यांनी केले.तर मित्रावरून झांबरे यांनी आभार मानले.