वाघोली, (प्रतिनिधी) – वाघोली येथे होणार्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी वाघोलीतील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांसोबत बुधवारी (दि. 14) पायी फिरून समस्या जाणून घेतल्या. वाहतुकीचे नियम तोडणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना लोणीकंद वाहतूक विभागाला त्यांनी दिल्या तर अन्य उपाययोजना करण्यासाठी महापालिका व अन्य विभागाची संयुक्त बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.
केसनंद फाटा येथून पाहणीला सुरुवात करण्यात आली. वाहतूक कोंडीची कारणे त्यांनी जाणून घेतली. विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक, महामार्गावर पार्क होणारी वाहने. अडथळा ठरणारे विद्युत पोल, पदपथावर होणारे अतिक्रमण, रस्त्यावर येणारे सांडपाणी, मंगळवारी आठवडे बाजारा मुळे वाहतुकीला होणारी अडचण, सकाळी व संध्याकाळी होणारी अवजड वाहतुक, महामार्गावर थांबणारे कंटेनर, रस्त्यावर बसणारे विक्रेते, महामार्गाची कमी रुंदी, रस्त्यातच थांबणार्या पीएमटी बसेस व त्यामुळे वाहतुकीला होणारी अडचण, खाजगी ट्रॅव्हल्समूळे होणारी कोंडी या सर्व बाबींची पाहणी करून काय उपाययोजना करता येतील याची चर्चा उपस्थितांबरोबर केली. जे रस्ते मुख्य महामार्गाला जोडून वाहतूक कोंडी कमी करता येईल त्या अंतर्गत रस्त्याची पाहणीही त्यांनी केली.