पुणे – ‘वाट दिसू दे …..पोलिसांची ड्युटी, हीच नागरिकांची सिक्युरिटी, घरात राहा सुरक्षित रहा !’ अशी भावनिक पोस्ट पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी हातात पुणेरी पाट्या हातात घेऊन कोरोना जनजागृती केली. दरम्यान, पुणे पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.