The truth behind Virat Kohli’s viral Insta story : विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाला आहे. या छायाचित्रात विराट कोहलीचा डोळा सुजलेला आणि गालावर, कपाळावर जखमा दिसत आहेत. नाकावर बैंडेज पट्टी दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो स्वतः विराट कोहलीने शेअर केला आहे. विराट कोहलीने स्वत: शेअर केलेल्या या Instagram स्टोरीची सध्या सोशल मीडियावर चर्चा असून या स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. अनेकांना हे नक्की घडलंय तरी काय असा प्रश्न पडलाय.
हा फोटो समोर आल्यानंतर विराट कोहलीचे चाहते तणावात आहेत. प्रत्येकाला आपल्या किंग कोहलीला काय झाले हे जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, हे छायाचित्र किंग कोहलीच्या इन्स्टा अकाऊंटवरूनही हटवण्यात आले आहे. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध प्रकारचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली. काहीनी तर विराटला मारहाण झाली असल्याच तर्क लावला आहे. तसेच काहीनी काळजीपोटी सर्व काही ठिक आहे का, असं विचारलं आहे.
फोटोमागचे सत्य काय…?
खरंतर, या फोटोमध्ये दिसणारा विराट प्रत्यक्षात जखमी झालेला नाही. त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा मारहाण झालेली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसणार्या जखमा फक्त मेकअपच्या होत्या. विराटने हा फोटो जाहिरातीचा भाग म्हणून केवळ सशुल्क भागीदारीसाठी(पेड पार्टनरशिप) पोस्ट केला होता.
What’s Virat Kohli upto?
King Kohli latest Instagram story. pic.twitter.com/EE6C00FuyU— Mufa (@MufaKohlii) November 27, 2023
दरम्यान, कोहलीनं Instagram स्टोरीवर पोस्ट केलेला फोटो एका बूट बनवणाऱ्या कंपनीचं प्रमोशन असल्याचंही सांगितलं जात आहे. त्याने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तसा उल्लेखही दिसत आहे. याच ब्रॅण्डच्या एका जाहिरातीत फार सूट असल्याने खरेदीसाठी लोकांची हाणामारी होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याच जाहिरातीच्या कॅम्पेनचा हा पुढील भाग असल्याचं म्हटलं जातं आहे.
विराट सुट्टीवर …
नुकत्याच झालेल्या 2023 च्या विश्वचषकातील धमाकेदार कामगिरीनंतर विराट कोहली सध्या सुट्टया Enjoy करत आहे. तो क्रिकेट जगतापासून पूर्णपणे दूर आहे. दरम्यान, तो त्याच्या गुंतवणुकीकडेही लक्ष देत आहे. त्याने अलीकडेच अनेक जाहिराती देखील शूट केल्या आहेत, ज्या त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहता येतील. हा व्हायरल फोटो त्याचाच एक भाग आहे.