India vs Australia 3rd T20 : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. टीम इंडिया सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अजेय आघाडी मिळवेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही संघात अनेक बदल केले आहेत. आजच्या सामन्यात कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हा सामना 7 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी, तिसऱ्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Australia win the toss and elect to bowl in Guwahati) ऑस्ट्रेलियाने प्लेइंग-11 मध्ये चार बदल केले आहेत.
🚨 Toss Update 🚨
Australia win the toss and elect to bowl in Guwahati.
Follow the Match ▶️ https://t.co/vtijGnkkOd#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZA4pH9wR3Y
— BCCI (@BCCI) November 28, 2023
मॅथ्यू शॉर्टच्या जागी ट्रॅव्हिस हेडचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी शॉन अॅबॉटच्या जागी जेसन बेहरेनडॉर्फ खेळत आहे आणि अॅडम झाम्पाच्या जागी केन रिचर्डसन खेळत आहे. स्टीव्ह स्मिथही हा सामना खेळत नसल्याने त्याच्या जागी अॅरॉन हार्डीला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेइंग-11 मध्ये एकमेव बदल केला आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या जागी आवेश खान खेळत आहे.
दरम्यान, मालिकेतील तिसरा सामना आज गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे, जो या मालिकेच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियासाठी करा किंवा मरो असा सामना आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या या T20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, या पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत आणि त्या दोन्हीमध्ये भारताने विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 2 गडी राखून सामना जिंकला होता. त्याच वेळी, दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 236 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया केवळ 191 धावा करू शकला आणि दुसरा सामना 44 धावांनी गमावला.