मुंबई – नुकतंच लोकप्रिय मालिका “पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा प्रियकर विकी जैन सोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अंकिता-विकी यांचा वविवाह मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये अतिशय राजेशाही थाटात पार पडला.
या विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच अनेकांनी या नवविवाहित जोडप्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग किर्तीनेही अंकिताला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिची पोस्ट सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अंकिताने तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि याच फोटोला सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग किर्तीनेही कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
“अभिनंदन, नवविवाहित जोडप्याला खूप खूप शुभेच्छा… श्वेता” असे तिने लिहिले आहे. श्वेता पाठोपाठ अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत.