एकावर गुन्हा : कोरेगाव भीमा येथील मारहाण प्रकरण
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे बुधवारी (दि. 9) रात्री झालेल्या मारहाण प्रकाराबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले असताना खोटी पोस्ट फेसबुकवर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.
किरण शिंदे (रा. वाई, महाबळेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर शैला अनिल काशीद (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, कोरेगाव भीमा येथे बुधवारी (दि. 9) रात्रीच्या सुमारास शिवसेने पुणे जिल्हा सल्लागार अनिल काशीद यांच्या इमारतीच्या समोर रस्त्यावर वढू बुद्रुक येथील पांडुरंग गायकवाड यांचे जावई तसेच मुलगी आणि कोरेगाव भीमा येथील नाना उर्फ गणेश फडतरे यांची भांडणे झा. याबाबत यांची विवाहित मुलगी साक्षी जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिलेली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या तक्रारीमध्ये फक्त अनिल काशीद यांच्या कार्यालया जवळ नेवून मारहाण करण्यात आली असल्याचे म्हटले असताना देखील; गुरुवारी (दि. 10) सकाळच्या सुमारास अनिल काशीद व त्यांची पत्नी शैला काशीद यांच्या मोबाईलवर किरण शिंदेने फेसबुक पेजवरून अनिल काशीद यांची बदनामी करण्याच्या हेतूने अनिल काशीद यांच्या सांगण्यावरून गायकवाड यांचे जावई तसेच मुलीस काशीद यांच्या ऑफिसमध्ये नेवून मारहाण करण्यात आल्याबाबतची पोस्ट व्हायरल करण्यात आल्याने काशीद यांची बदनामी होत असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास शक्रापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे करत आहे.