राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले.राज्यातील दोन महत्वाच्या पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं समीकरण काय असेल? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
अशातच बारामती लोकसभा (baramati Loksabha) मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार (Sunetra pawar) असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. अशात अजित पवार हे जेव्हा जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री झाले तेव्हा खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्याची मागणी आम्ही केली. मात्र श्रीनिवास पाटील यांनी अपात्र होण्यासारखं काहीही केलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
यानंतर सुनील तटकरेंसह अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळेंवर तुफान टीका सुरु झाली. सुप्रिया सुळे यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं आहे. अशात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी पक्ष वाढी साठी काय केलं असं म्हणत काही दिवसांपूर्वी टीका केली यावर आता अजित पवार गटातील रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत उत्तर दिल आहे.
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?पाया भरला,…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 25, 2023
रुपाली चाकणकर यांचं ट्विट