‘स्वतःची काळजी घ्या’ पत्रकारांच्या सुरक्षेवरून सुप्रिया सुळेंच भावनिक ट्विट

मुंबई – सध्या राज्यातील राजकारणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. शनिवारी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान, कालपासून महाराष्ट्रातील राजकारणाकडे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र, वेळात वेळ काढून पत्रकारांच्या सुरक्षेवरून “स्वतःची काळजी घ्या” असे भावनिक ट्विट केले आहे.

“माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो, ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या”. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.