वाघोली- जेवण उशिरा करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात मुलाने आईचा चाकु भोसकून खून केल्याची घटना वाघोली येथील गणेशनगर परिसरात तारांगण सोसायटीमध्ये घडली. शुक्रवारी संध्याकाळी साडे आठच्या सुमारास घडली. मुलाने केलेल्या हल्ल्यात आईला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या बहिणीवर देखील चाकूने हल्ला केला आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिलाबाई शामराव चव्हाण, असे खून झालेल्या आईचे नाव आहे. गणेश शामराव चव्हाण असे आईचा खून करणाऱ्या मुलास पोलिसांनी अटक केली आहे. बहीण प्रिया रवींद्र भोसले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.