Supriya Sule – बारामती अँग्रोमध्ये कथित गैरव्यावहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना आज बुधवारी ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. रोहित पवार यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहे. आज सकाळी रोहित पवार हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची तसेच अनेक कार्यकर्त्यांची भेट घेतली.
अशात सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या,’सत्यमेव जयते… सत्याचा विजय होईलच हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आवाहन येत राहतील पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू. हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचा आहे. जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम पवार साहेबांनी गेले सहा दशके केले आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. त्यासाठी आम्ही आजही आमची लढाई सुरु आहे.’ असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहे.
त्या पुढे म्हणाल्या,’सध्या केंद्रीय यंत्रणांचा विरोधकांविरोधात गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारचा ऑफिशियल स्टेटमेंट आहे. याविषयीचा डेटा आहे. त्यानुसार, 90 ते 95 टक्के प्रकरणे विरोधकांची असल्याचे त्यांनी सांगितले. आईस-म्हणजे इन्कम टॅक्स, ईडी आणि इतर यंत्रणा यांचा वापर विरोधकांविरोधात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे.’ असं म्हणत सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.