नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटपटू संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी खेळाडूंच्या मानधनात तसेच पगारात कपात होऊ शकते असे वक्तव्य केले होते. त्यावर लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी उपरोधीक टीका केली आहे.
सध्या संघातील खेळाडू या संघटनेचे सदस्य नाहीत, मग मल्होत्रा यांनी कोणाच्या वतीने असे वक्तव्य केले आहे. त्यांचे मत वाचुन माझे मनोरंजन झाले अशा शब्दात गावसकर यांनी फटकारले आहे. स्वतःच्या खिशाला चाट बसत नाही त्यावेळी हे असे वक्तव्य करणे सोपे असते असा टोलाही गावसकर यांनी मारला.