पोलीस ठाण्यातच कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

सातारा : जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचार्‍याने सातारा शहर पोलीस ठाण्यातच बाटलीतील विषारी औषध पिण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी रात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, प्रेम प्रकरणातून एका पोलीस कर्मचार्‍याला चौकशीसाठी अधिकार्‍यांनी बोलावले होते. यावेळी तू-तू मैं मैं झाल्यानंतर संबंधित कर्मचार्‍याने अचानक खिशातील बाटलीमधील विषारी औषध पिण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्या हातातील हिसकावून घेतली. हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मात्र, पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here