Ajit pawar | शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
१ मे, २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेरील नावाची पाटी चर्चेचा विषय ठरली. राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ यांना मिळाला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ नावाची पाटी कौतुकाचा विषय ठरली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेरील अजित पवार नाव बदलून आता त्या जागी अजित आशाताई अनंतराव पवार या नावाची पाटी लावण्यात आली आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाटी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे. राज्याच्या महिला धोरणाची तात्काळ अंमलबजावणीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
हे वाचालं का ?
अमरावतीतून निवडणूक लढवणार? सुजात आंबेडकर दिलं उत्तर; म्हणाले,’माझ्या उमेदवारीचा…’
Mother Name । आता शासकीय कागदपत्रांवर आईचंही नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा ‘निर्णय’